Pages

Pages

Monday, June 23, 2025

निरागस भेट

पाहुणे आले घरात
आले छोटे छोटे बाळ
बाळासंगे जुळली आमची
सुंदररितीने नाळ

सुंदर होती कांती तिची अन्
सुंदर होते हसणे
निरागस त्या बाळाला
नव्हते माहित रूसणे

तहानभूक आम्ही हरलो
विसरुन गेलो धकाधकीला
खेळवून बाळाला
झाला हर्षानंद मनाला

परतून जाताना
बाळालाही रडू त्या आले
राहायचे होते अजून त्याला
असे वाटू लागले

भेट कधी होणार पुन्हा
मना लागली आस
आजचा दिवस आमच्यासाठी
बनून गेला खास
✒ K. Satish