खातच गेले खातच गेले
खाऊन खाऊन फुटू लागले,
फुटूनी झाले तुकडे तरीही
अजून खायचे बोलू लागले
भ्रष्टाचारी मन हे असले
अंत न यांच्या स्वार्थाला,
पैसा खाती अतोनात तरी
समाधान ना मिळे मनाला
जीवन आहे एकच तरीही
पैसा हवा हो यांना अगणित,
फुकटचा मिळे ज्यावेळी तेव्हा
होतो आनंद यांचा द्विगुणित
पैसा पैसा करता करता
वय ते यांचे सरून गेले,
वार्धक्याच्या उंबरठ्यावरी
यांना उमजेना काय कमाविले
कमी जास्त त्या प्रमाणात हो
सर्वच जण कमावती पैसा,
सर्वांपेक्षा जास्त हवा मज
मनी का यावा हव्यास ऐसा
माणसासाठी पैसा आहे
पैशासाठी माणूस नाही,
प्रमाणात हो हवाच पैसा
अतिहाव कामाची नाही
✒ K. Satish

सत्य परिस्थिती
ReplyDeleteHearty Thanks...!!!
Deleteखूप छान
ReplyDeleteHearty Thanks...!!!
Delete