Thursday, June 11, 2026

सन्मानाची तुलना

पैशाशिवाय जरी हे
जग चालत नाही
तरी सन्मानाची तुलना
पैशाने होत नाही

कित्येक नादानांनी
पैशात तुलना केली
सदसद्विवेक बुद्धी
रसातळाला नेली

मोठ्या पदावर बसती
तरी थोडेही भान नाही
सन्मानाची तुलना
पैशाने होत नाही

अहंकार मोठा
पैशाचा माज खोटा
दुसऱ्याच्या जीवावरती
मोजती हे तर नोटा

रूबाब झाडण्याची
होते यांना घाई
सन्मानाची तुलना
पैशाने होत नाही

अकलेचे तारे हे तर
नित्य तोडतातं
समोरच्याला नेहमी हे
तुच्छ समजतातं

गुणांची कदर करण्याचे
भान यांना नाही
सन्मानाची तुलना
पैशाने होत नाही

जोवर पद आणि पैसा
तोवरच चाले माज
चित्र उद्या नसेल
जे चित्र आहे आज

चित्र पालटल्यावर
माज उतरून जाई
सन्मानाची तुलना
पैशाने होत नाही

✒️ K. Satish





No comments:

Post a Comment

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts