मुखवटे घालूनी माझ्यासमोर येती
समजले मला कोण षडयंत्र करती
लढा तो विचारांचा झेपत नाही म्हणूनी
खोट्या बदनामीचे हत्यार मग उपसती
चेहरे किती ते पडले प्रगती माझी पाहून
जंग जंग पछाडले विरूद्ध माझ्या जाऊन
फोडली कितीही जवळची माणसे तुम्ही
येते हो माझ्यासाठी सत्कर्म माझे धावून
गुलाम शिंकले तरी सन्मान त्यांचा करती
स्वाभिमानी जिंकता मना यातना होती
भीती किती ती वाटे चुकीच्या कर्माची
सामान्य माणसाला का हो घाबरती
मी नाही त्यातली कडी लावा आतली
अवस्था ही तुमची अशी कशी हो झाली
बडेजाव मोठा काय अर्थ त्याला
संपविण्यासाठी मजला किती षडयंत्र केली
इतके करण्यापेक्षा मन शुद्ध तुमचे ठेवा
क्रांतिकारी आहे मी करू नका कावा
आयुष्य आहे थोडे जगेन स्वाभिमानी
एक दिवस येईल कराल माझा धावा
घावं सोसण्याची ताकद माझ्यातं आहे
षडयंत्र हेरण्याचे कसब जाणिले आहे
दुष्कर्मफळे तुमची तुम्हास मिळण्याची
आतुरतेने आता मी वाट पाहत आहे
✒️ K. Satish

No comments:
Post a Comment