Saturday, April 11, 2026

खरी नाती - खरी दोस्ती

सशाच्या गतीने होता प्रगती
चिकटून बसती स्वार्थी नाती
मैत्रीच्या मुखवट्याखाली
दडून असते कपटी दोस्ती

खोटी वाहवा स्वार्थासाठी
वाईट घडण्याची प्रतिक्षा मोठी
ठेवून अंधारात तुम्हाला
बदनामी पसरवती खोटी

समाजातही अनेक नमुने
हेच हवे असते त्यांनाही
खोट्यालाही खरे मानूनी
तुम्हास दोषी म्हणूनी पाही

स्वभाव तुमचा सरळ अन् साधा
कपट तुम्हाला उमजत नाही
स्पष्ट सडेतोड भुमिकेमुळे
विरोधक तुम्हाला पाण्यात पाही

नियत असता स्वच्छ हो तुमची
रचते खेळी अशी नियती
घटना घडवती निरनिराळ्या
दूर जाती मग कपटी नाती

पुन्हा नव्याने कासवगतीने
प्रगतीपथावर पाऊल पडते
चांगले वाईट उमजूनी येते
आयुष्य तुम्हास असे घडवते

आनंदात होते आनंदी
दुःखात तुमच्या जे हिरमुसती
अशीच नाती मानावी आपुली
तिलाच मानावे खरी दोस्ती

✒️ K. Satish




2 comments:

  1. खूप सुंदर पद्धतीने शब्द हाताळता भाऊ तुम्ही आणि रोजच्या जीवनाशी संबंधित असते कविता तुमची

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...!!! 🙏🏻

      Delete

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts