जंगलामध्ये जाऊन तू
तोडू नकोस झाडं,
अरे, बघ रे वेड्या बंद होऊ लागलीत
पावसाची कवाडं
हळूहळू घालू लागलास तू
निसर्गावरती घाला,
स्वार्थासाठी बुजवून टाकलास
नदी आणि नाला
कागदांच्या नोटांसाठी
झालास वेडापिसा,
झाडेच राहिली नाहीत तर
कागदच बनेल कसा ?
रसरशीत फळे सगळी
आवडतात तुजला,
झाडांविना मिळतील कशी
सांग जरा मजला ?
रंगीबेरंगी फुले पाहून
तुझ्या डोळ्यांचे पारणे फिटते,
मग वृक्षसंवर्धन करण्याची तुला
लाज का बरे वाटते ?
निस्वार्थी ही झाडे बघ ना
उपकार सकलजनांवर करती,
अशुद्ध वायू शोषून सर्वांना
अमूल्य प्राणवायू देती
अमूल्य असा हा ठेवा तुजला
मिळाला आहे नशीबाने,
ऱ्हास लागला होऊ याचा
तुझ्या मतलबी स्वार्थाने
अजूनही वेळ हाताशी आहे
करूनी मन तू मोठे आज,
वृक्षसंवर्धन करूनी जोमाने
वाचव ह्या सृष्टीची लाज...!!!
✒️ K. Satish


















%20Poetrymirror.com%20title%20images_85.jpg)
%20poetrymirror.com-1_306.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_83.jpg)
%20poetrymirror.com-1_303.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_81.jpg)
%20poetrymirror.com-1_418.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_77.jpg)
%20poetrymirror.com-1_300.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_75.jpg)
%20poetrymirror.com-1_295.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_73.jpg)
%20poetrymirror.com-1_287.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_71.jpg)
%20poetrymirror.com-1_292.jpg)